स्पेशल रिपोर्ट : बंगळुरु : कर्नाटकचा अर्थसंकल्प मांडण्यावरुन काँग्रेस-जेडीएस आमनेसामने
Continues below advertisement
4 महिन्यांपूर्वी सिद्धरामय्या यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. पण दुर्दैवानं त्यांना सत्तेचं गणित सोडवता आलं नाही. मग मुख्यमंत्री झाले कुमारस्वामी. त्यांना आता पुन्हा अर्थसंकल्प मांडायचाय, ज्याला काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे 5 जुलैला कुमारस्वामींनी आपला हट्ट सोडला नाही, तर नाराज आमदार भाजपशी दोस्ती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 2019 पर्यंत आपल्या पदाला धोका नसल्याचं सांगणाऱ्या कुमारस्वामींचं सरकार महिन्याभरात कोसळण्याची भीती आहे.
Continues below advertisement