स्पेशल रिपोर्ट : नाशिक : रस्त्यावरचे खड्डे मोजणारं इस्रोचं मोबाईल अॅप
गुगल मॅपवर तुम्ही रस्ते, ट्राफीकची माहिती सहज मिळवता. तशीच भविष्यात कुठल्या रस्त्यावर किती खड्डे आहे, याची माहिती तुम्हाला मोबाईल अॅपवर मिळू शकणार आहे. ‘इस्त्रो’ने रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देणारं अॅप बनवण्याचं काम सुरु केलं आहे. देशातला पहिल्या रस्त्यांचं मॅप तयार करण्याचा प्रयोग नाशिकमध्ये इस्त्रोने सुरु केलाय.