स्पेशल रिपोर्ट : मेजर द्विवेदींच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी मेजर हांडाला अटक

Continues below advertisement
लष्करी अधिकारी मेजर अमित द्विवेदी यांच्या पत्नी शैलजा द्विवेदींच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. शैलजा यांनी लग्नाला नकार दिल्यामुळे मेजर निखिल हांडाने त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

मिसेस अर्थ... शैलजा द्विवेदी.. वय अवघं 35 वर्ष.. अर्बन डेव्हलमेंटमध्ये एमटेक, प्रचंड बुद्धिमान.. शनिवारी शैलजा द्विवेदींच्या हत्येने देश हादरुन गेला.

दिल्लीसाठी क्राईम ही नवी गोष्ट नाही. पण शैलजा द्विवेदीच्या हत्येने अख्खं पोलिस खातं कामाला लागलं. त्याचं कारण म्हणजे शैलजा लष्करी अधिकारी मेजर अमित द्विवेदी यांची पत्नी होती. आणि त्याशिवाय कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या कॅप्टन सौरव कालिया यांची चुलत बहीण.

शैलजा शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फिजियोथेरपीसाठी पती अमित यांच्या सरकारी गाडीनं आर. आर. हॉस्पिटलमध्ये आल्या. तिथे ट्रीटमेंट घेतली. मात्र त्यानंतर त्या एका पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटीतून बाहेर पडताना दिसल्या.
ही होंडा सिटी चालवत होता मेजर निखिल हांडा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram