स्पेशल रिपोर्ट : पुणे : बालेवाडीचं क्रीडा संकुल खेळाडूंसाठी की श्रीमंतांच्या लग्न सोहळ्यांसाठी?
पुण्यातील म्हाळुंगे - बालेवाडीच क्रीडा संकुल खेळाडुंसाठी आहे की, श्रीमंतांच्या आलिशान लग्नांसाठी आहे? असा प्रश्न खेळाडू विचारत आहेत. कारण या संकुलातील खुलं मैदान सातत्याने लग्नांसाठी भाड्याने दिलं जात असल्याने खेळाडुंना सराव करणं अशक्य झालं आहे. लग्नासारख्या कार्यक्रमांमधुन लाखो रुपये मिळत असताना इथल्या शूटिंग रेंजची मात्र पुरती वाट लागली आहे.