स्पेशल रिपोर्ट : व्हायरल व्हिडीओचा फटका, एपीएमसीत आंब्याच्या दरात घसरण

Continues below advertisement
आंब्यावर केमिकलची फवारणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे नवी मुंबई एपीएमसीमधील आंब्याचे दर घसरले आहेत. वाशीतील एपीएमसीत दिवसाला सव्वालाख ते दीड लाख आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. मात्र या व्हायरल व्हिडीओचा फटका आंब्याच्या विक्रीला बसला आहे.

आंब्यावर केमिकलची फवारणी करून चुकीच्या पद्धतीने आंबे पिकवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामुळे किरकोळ बाजारात आंबा विक्री घटल्याने आंब्याचे दर 400 रुपये डझनवरुन 200 रुपये डझनावर आले आहेत.

आंब्याचे दर जवळपास पन्नास टक्क्यांनी उतरल्याने कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय एपीएमसीतील व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram