स्पेशल रिपोर्ट : मुंबई : दूषित बर्फ रोखण्यासाठी शक्कल, अखाद्य बर्फ निळ्या रंगात
Continues below advertisement
दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या म्हणजेच अखाद्य बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे.
अखाद्य बर्फ थंड पेयात वापरला जाऊ नये, किंवा तो वापरला असल्यास तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे. एक जूनपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औद्योगिक बर्फ आणि खाद्य बर्फ वेगळा असावा यासाठी बर्फाच्या उत्पादना संदर्भातील अधिसूचना काढली होती. याबाबत विधानसभेच्या दोन्ही सभागृहात निवेदन सादर करण्यात आले होते. या पॅटर्नला केंद्रानेही मंजुरी दिली असून देशात सर्वच राज्यांना लागू केला आहे.