स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : सुनेशी पटत नसल्यानं मुलानं आईला स्मशानात ठेवलं

Continues below advertisement

मृत्यूनंतर माणसाला स्मशानात नेलं जातं, पण अहमदनगरमध्ये एका वृद्ध मातेवर जिवंतपणी स्मशानात राहण्याची वेळ आली आहे. बायकोशी पटत नाही म्हणून लक्ष्मीबाई आहुजा या मातेला त्यांच्या मुलानं चक्क स्मशानात ठेवलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये लक्ष्मीबाई दिवस कंठीत आहेत. ज्या मुलाला आयुष्यभर हाताच्या फोडाप्रमाणं जपलं, त्याच मुलानं या मातेला जिवंतपणी स्मशान दाखवलं. मात्र, तरीही या मातेचं काळीज मुलासाठी तळमळतं आहे. ‘मुलगा वाईट नाही. पण सुनेशी पटत नाही, त्याचा नाईलाज होतो, म्हणून त्यानं इथं ठेवलं आहे.’ असं म्हणत ही माता आपल्या मुलाला आजही पाठिशी घालते. मुलगा रोज डबाही आणून देतो. आता फक्त घरी कधी नेतो, याचीच ही माऊली वाट पाहत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram