स्पेशल रिपोर्ट : नक्षलवादी जंगलातील युद्ध शहरातील रस्त्यावर लढत आहेत?

Continues below advertisement
कोरेगाव भीमा हिंसाचाराने महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलं. इथली सामाजिक वीण उसवण्याचं काम केलं. दोन समाजांना एकमेकांसमोर उभं केलं. पण या हिंसाचाराआधी एक दिवस पुण्यात एक महत्वाचा कार्यक्रम झाला होता. तो होता एल्गार परिषदेचा. हिंसाचाराच्या घटनेला ही एल्गार परिषद कारणीभूत ठरल्याचाही आरोप झाला. मिलिंद एकबोटेला अटक झाली. संभाजी भिडेंची साधी चौकशीही झाली नाही हा एक भाग. मात्र या एल्गार परिषदेच्या माध्यमातून नक्षल्यांनी शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालवलाय का? असा संशय निर्माण होत आहे. कारण आज देशभरातील चार महत्त्वाच्या शहरातून पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांना अटक केली आहे. ज्यात सुधीर ढवळे, शोमा सेन यांच्यासह तिघांचा समावेश आहे. आणि त्यांच्यावर चक्क नक्षल्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram