VIDEO | भाजपतून घरवापसी केलेल्या नाना पटोलेंशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
अवघ्या साडेतीन वर्षात पंतप्रधान मोदींची आणइ भाजपाची साथ सोडून घरवापरसी केलेले नाना पटोले यांना आता नागपूरातुन काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे २०१४ साली भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे हेवीवेट उमेदवार प्रफ्फुल पटेलांचा पराभव करत खासदार बनलेल्या नाना पटोलेंचा आता सामना भाजपाचे नेते नितीन गडकरी यांच्याशी होणार आहे.
नाना पटोले यांना नितीन गडकरींसोबतच सामना करायचा आहे तो त्यांच्याच पक्षातल्या अतंर्गत गटबाजीचा.
कारण उमेदवारी जाहीर झाल्यावर पटोले जेव्हा नागपूरात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी विलास मुत्तेमवार, नितीन राऊत अनीस अहमद हे नागपूर काँग्रेसमधील प्रमुख नेते अनुपस्थित राहिले. तर नाना पटोलेंना उमेदवारी न देण्याची मागणी नागपुरातील अनेक अनुसूचित जातीमधील काही बुद्धीवंत, कार्यकर्ते आणि संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ई-मेलद्वारे केली होती.
तर आता अशा स्थितीत स्वकीयांसोबत विरोधकांचा सामना नाना पटोले कसा करमार याविषयी आज आपण त्यांच्याशी बोलूया