63 वर्ष अविरत रंगभूमीची सेवा करणारे कलाकार जयंत सावरकरांशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
रंगभूमी ही अशी जादू असते, जी सहजी कलाकाराची पाठ सोडत नाही. चेहऱ्याला एकदा का रंग लावला की आयुष्यभर तो जात नाही असं मजेने म्हणतात.. पण मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी मध्ये एक नाव असं आहे ज्यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू आहे. ते नाव म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर.
ज्या काळी रंगभूमी वर पूर्ण वेळ काम करणाऱ्यांकडे बघायचा एक वेगळा कटाक्ष होता, त्या 1955 च्या काळात, वयाच्या 20 व्या वर्षी सावरकर यांनी आपल्या रंगभूमीवर पाउल ठेवलं. आधी 12 वर्ष backstage artist, मग हौशी नाटकांमधून अभिनय, नंतर मुंबईत साहित्य संघात काम अशा वेगवेगळया व्यासपीठांवर आपल्याला सावरकर भेटत राहिले.
मास्टर अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मास्टर दत्ताराम, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम अशा अनेक पिढ्यांचे साक्षीदार ते आहेत.. आणि आज वयाची ८० वर्ष पार केल्यावरही रंगभूमीची कास त्यांनी सोडली नाहिये..
त्यांना नुकताच प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारही जाहीर झाला आहे.. प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित अजरामर नाट्यकृती वाजे पाऊल आपुले आणि टिळक - आगरकर या २ नाट्यकृती रंगभूमीवर येत आहेत. त्यातील वाजे पाऊलचे दिग्दर्शन जयंत सावरकर यांचं आहे.
आणि या निमित्तानं त्यांच्या इतक्या प्रदीर्घ प्रवासाविषयी आज त्यांच्याशी बोलुया..