कमाईच्या बाबतीत 'सोनू के टिटू की स्‍वीटी'ने 'पॅडमॅन'ला मागे टाकलं!

Continues below advertisement
कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा आणि सनी सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला 'सोनी के टिटू की स्विटी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरु आहे. विशेष बाब म्हणजे कमाईच्या बाबतीत या सिनेमाने अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'लाही मागे टाकलं आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, 'सोनू के टिटू की स्विटी'ने आतापर्यंत 82.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 'पॅडमॅन'ने 81 कोटींचा बिझनेस केला होता. या कमाईसह हा चित्रपट 2018 वर्षातील सर्वाधिक गल्ला जमावणारा दुसरा चित्रपट बनला आहे. सर्वाधिक कमाई दीपिका, रणवीर आणि शाहिदची भूमिका असलेल्या 'पद्मावत'ने केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram