गुजरातचा रणसंग्राम : सोमनाथ मंदिराच्या रजिस्टरमध्ये राहुल गांधींच्या नावाचा उल्लेख 'अहिंदू'

Continues below advertisement
गुजरातमध्ये सध्या मंदिर पॉलिटिक्स सुरु असल्याचंच पाहायला मिळतय. गुजरात विधानसभा प्रचार दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे नाव हिंदू नसणाऱ्या व्यक्तींच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेलंय. या कारणामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नवा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांना अहिंदू म्हणून आपले नाव का नोंदवावे लागले यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मंदिराच्या नियमानुसार हिंदू नसणाऱ्या व्यक्तीला प्रवेशासाठी प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव आणि माहिती भरावी लागते.
दरम्यान, या प्रकरणावरुन काँग्रेसनं स्पष्टीकरण देत भाजपवर निशाणा साधलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram