सोलापूर : विद्यापीठाच्या नामांतरावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ : विनोद तावडे

Continues below advertisement
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाचा वादामुळे सोलापूर शहर ढवळून निघालं आहे. एकीकडे लिंगायत समाजानं आज नामांतरणासाठी सोलापुरात मोर्चा काढला. तर दुसरीकडे सोलापुरात शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या एका कार्यक्रमात धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी तावडेंच्या दिशेनं भंडारा आणि पत्रके उधळली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं जावं, अशी मागणी धनगर समाजाची आहे. तर सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी सिध्देश्वर विद्यापीठ असं नाव द्यावं असा लिंगायत समाजाचा आग्रह आहे.
दोन्ही समाजाकडून नामांतराची मागणी होत असल्यानं राजकीय नेते हतबल झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram