सोलापूर : उजनीमधील उन्हाळ्यातील पाणीसाठा 40 वर्षातील उच्चांकी पातळीवर
Continues below advertisement
सोलापुरातील उजनीच्या पाण्यावरुन जिल्ह्या-जिल्ह्यांत होणारा संघर्ष यंदा बघावयास मिळणार नाहीय. कारण उजनीचा उन्हाळ्यातील पाणीसाठा गेल्या 40 वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. सध्या उजनीत 86.85 टीएमसी अर्थात 43.29 टक्के इतका पाणीसाठा आहे. उजनी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 117 टीएमसी आहे. पण यावर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने हा पाणीसाठी 121 टीएमसी वर पोहोचला होता. मोठ्याप्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याने उजनीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवल्यामुळे पाण्याचे काटेकोर पणे नियोजन करण्यात आले. गेल्या हंगामादरम्यान कालवा, तळे, तलाव, बंधारे भरण्यात आले. त्यामुळे पाण्याची मोठ्याप्रमाणावर साठवण झाली आणि त्यामुळेचं उजनीच्या धरणात मोठा पाणीसाठा आहे.
Continues below advertisement