Sushil Kumar Shinde | भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विलिनीकरण होणार : सुशीलकुमार शिंदे | ABP Majha
काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.