सोलापूर : आरक्षित जागेत बंगला बांधला, सुनावणीला सहकारमंत्री सुभाष देशमुखांची गैरहजेरी

Continues below advertisement
अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर तब्बल 22 हजार स्क्वेअर फूटाचा भला मोठा बंगला बांधणारे सुभाष देशमुख कारवाईला मात्र केराची टोपली दाखवताना दिसतायत.
कारण या प्रकरणाची तक्रार आय़ुक्त आणि संबंधित खात्यांकडे केल्यानंतरही सुभाष देशमुख सुनावणीला हजर राहणं टाळतायत. दरम्यान आजच्या सुनावणीला मंत्री सुभाष देशमुख यांच्याऐवजी त्यांचे कुटुंबिय हजर राहतील, असं सांगण्यात आलंय.
विशेष म्हणजे गेल्या दोन सुनावणीच्या वेळीही सुभाष देशमुखांनी दांडी मारली होती. त्यामुळे सामान्यांना आणि मंत्र्यांना असे दोन न्याय देशात काम करतात का ? असा सवाल सोलापूरकर जनता विचारतेय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram