सोलापूर : संभाजी भिडेंना अटक होईपर्यंत लढा सुरुच राहणार : प्रकाश आंबेडकर
मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट दिली असली तरी भीमा कोरेगाव दंगलीचे सूत्रधार संभाजी भिडेच आहेत. त्यांना अटक होईपर्यंत लढा चालूच राहणार आहे असा इशारा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. ते सोलापुरात बोलत होते. तसच भिडेंना अटक न झाल्यास अधिवेशनाला घेराव घालू असंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आऱोपही त्यांनी केलया. भिडेंना समर्थनार्थ जे मोर्चे निघाले त्यांना विरोध आणि समर्थन दोन्ही नाही असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना त्यांनी रामदास आठवलेंवरही टीका केलीये.