सोलापूर : पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्वदीच्या उंबरठ्यावर

Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्यानं देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकलेत. मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८२ रुपये तर डिझेल लिटरमागे ६९ रुपये ७० पैसे इतके झाले आहे. गेल्या साडेचार वर्षांतील हे सर्वाधिक दर आहेत. त्यामुळे आता इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी समोर येत आहे. चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर प्रतिबॅरल १०५ डॉलर होते. आता ते ७४ डॉलर आहेत. म्हणजेच चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमीच आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram