सोलापूर : महापालिकेच्या उद्यान विभाग कार्यालयात सामानाची तोडफोड
Continues below advertisement
सोलापूर महानगरपालिका उद्यान विभागात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. नगरसेवकांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून कार्यालयातील सामानांची मोठी तोडफोड करण्यात आली. संगणक, टेबल, खुर्च्या तोडण्यात आल्या. त्याचबरोबर कागदपत्रेही फेकण्यात आली. प्रभागात काम करण्यासाठी मनपा कामगार उपलब्ध न करुन दिल्याने, शिवसेना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड करत शिवीगाळ केल्याचा आरोपही महापालिकेच्या कामगारांनी केला आहे.
Continues below advertisement