सोलापूर : म्होरक्या सिनेमाचे निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या
Continues below advertisement
सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली. आतड्याच्या कर्करोगाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या पडाल यांना काविळही झाला होता. शिवाय कर्करोग हा लास्ट स्टेजला होता.
कल्याण पडाल यांच्या म्होरक्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाची मोठी उत्सुकता होती. हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र आता कल्याण पडाल यांच्या आत्महत्येमुळे हा सिनेमा वेळेत रिलीज होईल, की पुढे ढकलला जाईल, याकडे लक्ष लागलं आहे.
कल्याण पडाल यांचं वय केवळ 38 वर्षे एवढं होतं. मात्र कर्करोगाने त्यांना ग्रासलं आणि आजाराला वैतागून त्यांनी दोन दिवसांपूर्वी आयुष्य संपवलं. सोलापूर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.