Solapur | बी. टेकची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने सोलापुरातील मोहोळमध्ये मुलीची आत्महत्या | ABP Majha
शिक्षणासाठी फी भरायला पैसे नसल्याने एक विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील देगाव येथे ही दुर्दैवी घटना आहे. रुपाली रामकृष्ण पवार असं या मुलीचं नाव आहे. रुपालीचा पंजाबच्या जालिंदर येथील लव्हली प्रोफेशनल अकॅडमीला बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता.