सोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला पाडा : आमदार बच्चू कडू
सहकार मंत्र्यांचा बंगला पाडेपर्यंत सोलापूर महानगरपालिकेनं इतर कोणतीही दुसरी कारवाई करू नये, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत, सुभाष देशमुखांचा बंगला पाडा मगच शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारा, असं मत त्यांनी यावेळी मांडलं. सुभाष देशमुखांवर सोलापुरात बेकायदेशीररित्या बंगला उभारल्याचा आरोप आहे.