सोलापूर : एसटी सुरु ठेवा, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची महमंडळाला विनंती
राज्यभर मराठा समाजानं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असताना तिकडे सोलापुरात मात्र मराठा समाजानेच एसटी सुरु ठेवण्याचं आवाहन केलं आहे. वारीसाठी सोलापुरात दाखल झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला घरी जाईपर्यंत एसटी वाहतूक बंद होणार नाही, याची जबाबदारी सकल मराठा समाजाने घेतली आहे. आज सकाळपासून मराठा समाजाचे कार्यकर्ते सोलापूर बसस्थानकात ठाण मांडून आहेत. आंदोलकांनीच वाहतूक सुरु ठेवण्याचं आवाहन केल्याने सोलापूर आगारातून वाहतूक सुरळीत आहे.