सोलापूर : ऊसदरासाठी शेतकऱ्यांचं सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यासमोर भजन आंदोलन
Continues below advertisement
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे इथे असणाऱ्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री भजन-कीर्तन आंदोलन केलं.
सुभाष देशमुखांना सुबुद्धी देवो आणि उसाला पहिली उचल 2700 रुपये द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.
गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचं लोकमंगल कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
त्यातूनच आक्रमक होऊन रात्री हे आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, उपोषणामुळे सोलापूर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
Continues below advertisement