VIDEO | ज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांचं निधन | एबीपी माझा
ज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांचं आज सकाळी वयाच्या 87व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. मराठी साहित्याच्या सेवेबरोबर त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं जीवनकार्य आणि साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला होता. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे गो. मा. पवार यांनी काही वर्ष अध्यापनाचं कार्य केलं. निवृत्त झाल्यानंतर ते सोलापुरात स्थायिक झाले होते. आतापर्यंत 16 ग्रांथाचे लेखन, विविध विषयांवरील 60 शोधनिबंध त्यांनी सादर केलं आहेत.