सोलापूर : स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी सोलापुरात लिंगायत समाजाचा महामोर्चा
Continues below advertisement
स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी आज सोलापुरात लिंगायत समन्वय समितीने मोर्चा काढला. वेगवेगळ्या मठाचे धर्मगुरु या मोर्चात सहभागी झाले होते.
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज 3 जून रोजी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. सकाळी सोलापुरातील महात्मा बसवेश्वर सर्कलपासून मोर्चाला सुरुवात झाली.
शेकडो लिंगायत समाज बांधवांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.