सोलापूर : सुपारी दिली, पैसे नाही, गौरी लंकेश हत्या प्रकरणी आरोपी वाघमारेचा दावा

Continues below advertisement
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी परशुराम वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीने केलेल्या चौकशीत परशुराम वाघमारेने गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी आपणच घेतल्याची कबुली दिली आहे.

सुपारी देणाऱ्यांनी पैसे न दिल्याचाही दावा त्याने केला. सुपारी देणाऱ्यांनी केवळ 10 हजार रुपये अॅडव्हान्स आणि बंगळुरुत राहण्यासाठी तीन हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम न देताच ते पिस्तुल घेऊन फरार झाले, असं वाघमारेने एसआयटीच्या चौकशीत सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram