सोलापूर : ऊसाला पहिला हप्ता साडेतीन हजार, जनहित कार्यकर्ते आक्रमक
Continues below advertisement
सोलापुरात ऊस दराच्या पहिल्या हप्त्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या निवासस्थानाबाहेर जनहितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोठा पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी चुकवून जनहितचे कार्यकर्ते देशमुखांच्या निवासस्थानाबाहेर पोहचले. दरम्यान पोलिसांनी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुखांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस चौकीबाहेर घोषणाबाजी केली.
Continues below advertisement