Helmet Compulsion | सोलापुरात पुन्हा हेल्मेट सक्ती, विनाहेल्मेट आढळल्यास 500 रुपये दंड | ABP Majha
Continues below advertisement
सोलापुरात पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. याआधी हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र सोलापूर शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर ही हेल्मेटसक्ती पुन्हा सुरु करण्यात आली आहे. हेल्मेटचा वापर न केल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जात आहे. वाहन चालवताना फोनवर बोलताना आढळल्यास वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. सकाळपासूनच पोलिसांकडून शहरात या कारवाईला सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement