सोलापूर : कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा, सोलापूरमधील विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला.
जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास दीड वर्षे हा खटला चालला. या दीडवर्षाच्या युक्तीवादानंतर आज अवघ्या 6 मिनिटात निकाल देण्यात आला.
खचाखच भरलेल्या न्यायालयात टाचणी पडल्याचाही आवाज येईल, अशी शांतता होती.
Continues below advertisement