सोलापूर: दलित वस्ती सुधारणेचा निधी खर्च न केल्याचा निषेध, पालकमंत्र्यांविरोधात आंदोलन
सोलापूरात बहुजन समाज पक्षानं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात आंदोलन केलंय. दलित वस्ती सुधारणेचा निधी खर्च न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या वर्षभरात दलित वस्ती सुधारणासंबंधी एकही बैठक झाली नसल्याचा आरोपही बहुजन समाज पक्षानं केला आहे. पालकमंत्र्यांनी निधीची तरतूद न केल्यास आंदोलनाची मालिका चालवण्याचाही इशाराही यावेळी देण्यात आला.