सोलापूर : अनधिकृत बांधकाम प्रकरण, दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीला सुभाष देशमुख आणि आयुक्तांची दांडी
सोलापूर महापालिकेच्या आरक्षित जागेवर बंगला बांधल्यानं अडचणीत आलेले सुभाष देशमुख सलग दुसऱ्या सुनावणीला गैरहजर राहिले आहेत. अनधिकृत बांधकामाप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांसमोर देशमुख यांनी सुनावणी होणार होती. मात्र पालिका आयुक्त आणि स्वतः मंत्रीमहोदय उपस्थित न राहिल्यानं सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे सरकार सुभाष देशमुखांना पाठिशी घालत आहे का.. अशी शंका उपस्थित होतेय. आता पुढची सुनावणी 26 तारखेला होणार आहे. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी हाताळावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीए. सोलापूर शहरातल्या होटगी रोडवर देशमुखांचा बंगला आहे. मात्र अग्निशमन दलाच्या आऱक्षित जागेवर हे बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सुभाष देशमुख यांनी मात्र यापूर्वीच सर्व आरोप फेटाळले. आणि योग्य परवनागी घेऊन बांधकाम केल्याचं सांगितलंय.