सोलापूर : अल्पवयीन भाच्याला गाडी चालवायला दिली, मामाला तुरुंगवास
Continues below advertisement
हौस पुरवण्यासाठी अल्पवयीन मुलांकडे दुचाकी चालवायला देत असाल तर थांबा.. यामुळे तुम्हाला कदाचित जेलची हवाही खावी लागू शकते. असाच प्रकार सोलापुरात घडलाय. सतरा वर्षांच्या भाच्याला बाईक चालवायला देणाऱ्या मामाची रवानगी थेट तुरुंगात होणाराय. मजरेवाडीच्या राजेंद्र कांबळेंना सोलापूरच्या न्यायालयानं कारावासाची शिक्षा सुनावलीय. चार दिवस साधी कैद आणि एक हजार रुपये दंड असं या शिक्षेचं स्वरुप आहे. पोलिसांनी यापूर्वी अल्पवयीन मुलांना गाडी चालवताना पकडून दंडात्मक कारवाई केलेल्या आहेत. पण थेट तुरुंगात टाकण्याची अशा प्रकारची शिक्षा पहिल्यांदाच सुनावण्यात आलीय.
Continues below advertisement