मुंबई : 200 आणि 2000 रुपयांच्या खराब नोटा बँकेत बदलता येणार नाहीत!

200 आणि 2000 रुपयांच्या नोटा जारी करुन आता सुमारे दीड वर्ष झालं आहे. पण या नोटा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खराब झाल्या तर त्या बँकेत जमा करता येणार नाहीत किंवा त्या बदलताही येणार नाहीत. कारण करन्सी एक्स्चेंज नियमांच्या कक्षेत नव्या नोटा ठेवलेल्याच नाहीत.

फाटलेल्या किंवा खराब नोटा बदलण्याचं प्रकरण आरबीआयच्या (नोट रिफण्ड) नियामाच्या अंतर्गत येतं. आरबीआय कायद्याच्या कलम 28 चा तो भाग आहे. या कलमात 5, 10, 50, 100, 500, 1,000, 5,000 आणि 10,000 रुपयांच्या नोटांचा उल्लेख आहे. पण 200 आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा यात समावेश नाही. याचं कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयने या नोटांच्या एक्स्चेंजवर लागू होणाऱ्या तरतुदींमध्ये बदल केलेला नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola