मुंबई : सोहराबुद्दीन एन्काऊंटर खटल्यावरुन हायकोर्टाने सीबीआयला झापलं

Continues below advertisement
सोहराबुद्दीन एन्काऊंटर खटल्यावरुन मुंबई हायकोर्टाने सीबीआयला अक्षरश: झापलंय. या प्रकरणात आतापर्यंत अनेक साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवलीय. हा प्रकार गंभीर असून साक्षीदारांना संरक्षण देणं हे सीबीआयचं काम आहे अशा शब्दात हायकोर्टाने सुनावलंय. या खटल्यात सीबीआयच सहकार्य मिळत नसल्याची उद्विग्नता न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी सुनावणी दरम्यान व्यक्त केली. काही पोलीस अधिका-यांना दोषमुक्त करण्यात आल्यानंतर त्याविरोधात अपील करण्यासाठी सीबीआयनं कोणतीही तसदी घेतली नाही याबद्दलही हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. हा खटला चालवायची तुमची इच्छा नाहीये का? असा सवालही हायकोर्टाने यावेळी सीबीआयला विचारला. 29 नोव्हेंबर 2005 रोजी सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांचं एन्काऊंटर झालं होतं...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram