श्रीनगर : वैष्णोदेवी मंदिर परिसरात तुफान बर्फवृष्टी, पावसाचीही हजेरी

Continues below advertisement
उत्तरेत बर्फवृष्टीने कहर केला असून अनेक गारठून टाकणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेतायत. तर दुसरीकडे जगभरात प्रसिद्ध अशा वैष्णो देवी मंदिर परिसरात बर्फवृष्टी झालीय. यामुळे मंदिर परिसर  पांढऱ्याशुभ्र रंगात नटलेला पाहायला मिळतोय. मंदिरात जाणाऱ्या वाटेवर सर्व ठिकाणी बर्फच बर्फ पाहायला मिळतोय. भाविक देवीच्या दर्शनासोबत या हिमवर्षावाचाही आनंद घेताना दिसतायत. रविवार रात्री उशीरापासून सातत्याने पाऊस पडतोय, त्यामुळे थंडी वाढलीय आणि वैष्णो भवन मार्गावर गार वारे वाहतायत. पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु असली तरीही वैष्णो देवी यात्रा सध्या तरी सुरळीत सुरु आहे. या थंडीत मंदिर परिसरात दुसऱ्यांदा बर्फवृष्टी झालीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram