IMD Weather Report | केरळमध्ये मान्सून 6 जूनला धडकणार, आयएमडीचा अहवाल | एबीपी माझा
मान्सून यंदा उशिराने भारतात दाखल होणार आहे. 6 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर स्कायमेटने मान्सून 4 जूनला केरळमध्ये धडक देईल असं काल सांगितलं होतं. गेला वर्षी मान्सून केरळमध्ये 29 मे रोजी तर 2017 मध्ये 30 मेला दाखल झाला होता. पण यंदा मान्सूनला आठवडाभर उशीर होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदाचा मान्सून सर्वसाधारण असेल.