गुगललाही न सापडणारं 'जिओ इन्स्टिट्यूट' देशात सर्वोत्तम
गुगलला फक्त जगातलंच नाही, तर जगाबाहेरचंही सगळं ठाऊक आहे, असं तुम्हाला वाटतं का? तर तुमचा समज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने खोटा ठरवला आहे. जगात अशी एक गोष्ट आहे, जी गुगललाही माहित नाही, मात्र ती भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आहे. आणि या संस्थेचं नाव आहे 'जिओ इन्स्टिट्यूट'