नाशिक : जम्मूत जवानाकडून हत्या झालेल्या केकाण दाम्पत्यावर सिन्नरमध्ये अंत्यसंस्कार
Continues below advertisement
नाशिकमधील जवानाची पत्नीसह गोळ्या झाडून काश्मीरमध्ये हत्या करण्यात आल्यानंतर आज दाम्पत्यावर सिन्नरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याची मागणी मृत्युमखी पडलेल्या राजेश केकाण यांच्या भावानं केलीये. काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ईंगलप्पा या जवानाने बुधवारी रात्री स्वत:च्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर त्यानं राजेश केकाण आणि त्याची पत्नी शोभा यांना देखील गोळ्या घालून ठार केले. या दुर्दैवी घटनेमुळे राजेश यांची 2 लहान मुलं अनाथ झाली असून संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शेतीमध्ये मजुरीचं काम करत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करुन राजेश सैन्य दलात रुजु झाला होता.
Continues below advertisement