#MeToo | गायिका सोना मोहापात्राचे कैलाश खेरवर गैरवर्तनाचे आरोप

Continues below advertisement
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने दिग्गज गायक कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. 'मुंबईत एका कॅफेमध्ये कॉन्सर्टविषयी बोलण्यासाठी आम्ही भेटलो. त्यावेळी कैलाश यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. बरं झालं, एखाद्या अभिनेत्याऐवजी तू संगीतकाराला म्हणजेच राम संपतला जोडीदार म्हणून लाभलीस, असं कैलाश खेर म्हणताच मी तात्काळ निघून गेले. पण त्यांना फरक पडला नाही' असा दावा सोनाने केला आहे. ढाका विमानतळावर उतरल्यावर मी त्यांचा फोन घेतला नव्हता. तेव्हा आयोजकांच्या फोनवरुन त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. साऊंड चेक रद्द करुन त्याऐवजी माझ्यासोबत वेळ घालवण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला, असं सोनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
'किती महिलांची माफी मागाल? आता सुरुवात केली, तर आयुष्य कमी पडेल' असा खोचक टोलाही तिने लगावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram