Anand Shinde | प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून थोडक्यात बचावले! | ABP Majha
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आनंद शिंदे सुखरुप बचावले असून गाडीचं मोठं नुकसान झाला आहे. आनंद शिंदे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे इथे पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे. तर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. इंदापूरमध्ये डॉ अविनाश पाणबुडे यांच्या खासगी दवाखान्यात उपचार करुन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत.