ABP News

मुंबई : रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी गायक उदीत नारायण यांच्या मुलाला अटक

Continues below advertisement
मुंबई : प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रॅश ड्रायव्हिंग करत रिक्षाला धडक दिल्यामुळे मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत.

अंधेरीतील लोखंडवालाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर आदित्य नारायणने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र अपघातात जखमी झालेल्या महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कलम 279 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करत आदित्यला अटक केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram