सिंधुदुर्ग : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, कोकण रेल्वे वाहतुकीवरही परिणाम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. जिल्ह्यातल्या कणकवली, वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग आणि मालवणमध्ये काल रात्रीपासून तुफान पावसाच्या सरी बरसतायत. जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
सिंधुदुर्गातील पावसाचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झालेला दिसतोय.. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक मंदावली आहे... तर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक एक-दोन तास उशिरानं सुरु आहे.. कोकणकन्या दोन तासानं, तुतारी एक्स्प्रेस एक तास उशिरानं सुरु आहे... तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही उशिरानं धावताहेत...