सिंधुदुर्ग : आंबोलीतील कावळेसाद पॉईंटला आणखी दोन अज्ञात मृतदेह सापडले
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आता हत्या करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं ठिकाणं झालंय का असा प्रश्न पडू लागलाय..कारण काहीच दिवसांपूर्वी अनिकेत कोथळेचा मृतदेह इथं सापडल्यानंतर आता पुन्हा 2 अज्ञात मृतदेह इथं सापडले आहेत..दोन्हीही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून स्थानिक बचाव पथकाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलेत...हे मृतदेह स्त्री आणि पुरुषाचे असल्याचं कळतंय...मात्र अद्याप या मृतदेहांची ओळख पटलेली नाही...
Continues below advertisement