सिंधुदुर्ग : आंबा आणि काजूच्या बागा आगीत भस्मसात, लाखोंचं नुकसान
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधल्या कोटकामतेत परिसरातील फळबागा आगीच्या विळख्यात सापडल्याने मोठं नुकसान झालयं. यात ४१ लाख किमतीच्या दोन हजार आंबा आणि काजूच्या कलमांचं नुकसान झालंय. महावितरणच्या ठेकेदारांकडून विद्युत वाहिन्यांचे पोल गॅस कटरने कापत असताना उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागली. या आगीत दहा बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. याबाबत महावितरणचे ठेकेदार ज्योतिबा पाटील आणि त्यांच्या चार कामगारांविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement