सिंधुदुर्ग : आचरा समुद्रात 125 किलोंचा डॉल्फिन मृतावस्थेत

Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमधील आचरा समुद्रात १२५ किलो वजनाचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळलाय . हा मासा मोठ्या बोटींना आदळल्याने किंवा मोठ्या माश्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. आचरा समुद्रात गेल्या काही दिवसांपासून मच्छिमारांना डॉल्फिनचं दर्शन होतंय. डॉल्फिनच्या समुद्रातील वावरामुळे मासे घाबरून किनाऱ्याकडे येत असल्याने याचा मच्छीमारांना फायदा होतोय. तसच बऱ्याचदा डॉल्फीनचे समुद्रातले खेळ सुद्धा बघायला मिळतात. पण इतका मोठा डॉल्फीन मासा मृतावस्थेत आढळल्यामुळे ही प्रजाती धोक्यात असल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram