सिंधुदुर्ग : आकेरीतील श्री देव रामेश्वर मंदिरात रथोत्सव साजरा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळच्या आकेरी गावात मोठ्या उत्साहात रथोत्सव साजरा करण्यात आलाय. महाशिवरात्रीच्या तिसऱ्या रात्री श्री देव रामेश्वर मंदिरात हा रथोत्सव साजरा केला जातो. मंदिरातला हा रथ सात माळ्यांचा असून सावंतवाडीच्या सावंत-भोसले राजघराण्याने हा लाकडी रथ तयार करुन घेतलाय. रथावर नारळ फोडण्याचा भोसले घराण्याचा मान आजही कायम आहे. हा रथ घेऊन देवालयाभोवती एकत्र प्रदक्षिणा घातली जाते. या सोहळ्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.