सिंधुदुर्ग : तळकोकणात मान्सून दाखल, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं
तळकोकणात मान्सून दाखल झाला असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पोहचेल, असा अंदाज आहे. काल रात्री मुंबईतल्या मुलुंड, भांडुप आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला. तर सकाळी अंधेरी, वांद्रे, पवई, कुर्ला इथंही जलधारा बरसल्या. तिकडे कोकणातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला आहे. आडारी, देऊलवाडा, आडवन अशा भागात पाणी घुसल्यानं लोकांची तारांबळ उडाली. तर रायगडमध्ये म्हसळा, पेण , अलिबाग, उरण या भागात चांगला पाऊस झाला.