सिंधुदुर्ग : कोकणासह गोव्यात मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Continues below advertisement

तिकडे कोकणातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तिलारी, जगबुडी, जानवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाची संततधार सुरु राहिली तर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचलं आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली परिसरात जोरदार पाऊस बरसला. पण सध्या पावसानं उसंत घेतली आहे. तर रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये गेल्या 24 तासात 360 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

रत्नागिरीमध्येही पावसाचा जोर मंदावला आहे. मात्र चिपळूण आणि खेडमध्ये पाऊस सुरु आहे.

तिकडे गोव्यात सुध्दा पाऊस बरसतो आहे. पुढील दोन दिवसात गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram