NIesh Rane | 'चिखलफेक' आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेबांना नक्कीच आवडलं असतं : नितेश राणे | ABP Majha
'चिखलफेक' आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडलं असतं, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन बाकी कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब हयात असते तर त्यांना नक्कीच आवडलं असतं. ते म्हटले असते शाब्बास नितेश तू चांगलं काम केलंस, असं म्हणत नितेश यांनी गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.